Rohit Rajendra Pawar

Rohit Rajendra Pawar

Share

17/09/2026

राज्यात सरकार भाजपाचं..
गृहमंत्रीपदही भाजपाकडंच..

असं असताना मदतीसाठी गेलेल्या तरुणीवर चाकूचा धाक दाखवून आणि दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक गुन्हा भाजपचेच माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्यावर पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाला.

विशेष म्हणजे हे मा. आमदार महाशय हेही भाजपाचेच…
आता भाजपाचं राज्य म्हणजे यांनी कितीही महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या किंवा लाडक्या बहिणीचा डांगोरा पिटला तरी यांचं राज्य हे महिलांना भक्ष्य करणाऱ्या नराधमांना पोसणारं आहे, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं. आता या नराधम मा. आमदाराला कधी अटक होते की त्यालाही ‘मैत्री’च्या संबंधांचा फायदा होऊन अटकपूर्व जामीन मिळतो, याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.

Photos from Rohit Rajendra Pawar's post 17/09/2026

अखेर संतोष पंडित यांना जामीन मंजूर झाला. याबद्दल न्यायालयाचे आभार! संतोष पंडीत तक्रारदाराला धमकावू शकतात, तक्रारदाराला प्रभावित करू शकतात म्हणून जामीन देऊ नये, हा सरकारी पक्षाचा तकलादू युक्तिवाद कोर्टात टिकला नाही.

तक्रारदार/सरकारी पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका speculative apprehension असल्याचा न्यायालयाने केलेला उच्चार म्हणजे पुणे पोलिसांना एक मोठी चपराक आहे. मुळात ही केस कोर्टात टिकत नसते, हे लहान मुलालाही कळतंय, परंतु केवळ राज्यकर्त्यांच्या ईगोला हात घालणाऱ्या संतोष पंडित यांना काहीही करून जेलची हवा खाऊ घालायचीच ही राज्यकर्त्यांची इर्षा होती. जेव्हा प्रत्यक्ष खटला सुरु होईल तेव्हा पुण्याचे CP अमितेश कुमार कसे HMV (his masters voice) आहेत याचे कोर्टात जाहीर धिंडवडे निघतीलच.

तूर्तास सर्वसामान्य पुणेकरांचा आवाज पुन्हा दुमदुमण्याचा मार्ग मोकळा झाला, याचा आनंद आहे.

17/09/2026

१५ वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले, पोलीस आणि न्यायालयांच्या फेऱ्या मारल्या, तरीही न्याय न मिळाल्याने पंतप्रधान मोदी साहेबांच्या मित्राने मोदी साहेबांची भेट घेताच त्यांच्या जागेवर भाजप आमदाराने मारलेला ताबा लगेच सोडला. १५-१५ वर्षे न्याय मिळत नसेल आणि मित्राला एका भेटीत न्याय मिळत असेल, तर या देशात सामान्य नागरिकांसाठी न्यायाचा मार्ग न्यायालय आहे की मैत्री? असा प्रश्न पडतो.

एका भेटीत मोदी साहेबांच्या मित्राला न्याय मिळतो, फडणवीस साहेबांचा केवळ मित्र आहे म्हणून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला MPSC अध्यक्षपदावरून हटवलं जात नाही. मग ‘मैत्री’ हाच भाजप राज्यात न्याय मिळण्यासाठीचा निकष असेल, तर भाजपने आता ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेखाली ‘ओळख असेल तरच न्याय’ अशी तळटीप द्यायला हरकत नाही.

#न्याय_सर्वांसाठी #समान_न्याय #लोकशाही

17/09/2026

देवशिल्पी भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

#विश्वकर्मा_जयंती

Address


Srujan House, Ganeshdatta Co-Operative, SHRUJAN HOUSE, Plot No 10A, HSG Society, Sahakar Nagar, Parvati
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohit Rajendra Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.