Wagholi Times

Wagholi Times

Share

12/10/2026

वाघोली येथे मोबाईल टॉवरवर चढलेल्या तरुणाला PMRDA वाघोली अग्निशमन दलाकडून सुखरूप खाली उतरवले. वाघोली पोलिसांनी सांभाळली कायदा व सुव्यवस्था
वाघोली टाईम्स : दि. 12/10/2026 (सायं. 5:50 वा.) - केसनंद फाटा, वाघोली येथे एक अज्ञात व्यक्ती मोबाईल टॉवरवर चढला असल्याची वर्दी वाघोली पोलीस स्टेशनचे बिट मार्शल गोरे यांच्याकडून PMRDA वाघोली अग्निशमन केंद्रास प्राप्त झाली.
वर्दी प्राप्त होताच वाघोली अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन व प्रशिक्षित कर्मचारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर वाघोली अग्निशमन दलाचे जवान साईनाथ मोरे (फायरमन), सागर जानकर (PDRF जवान) आणि राजेंद्र फुंदे (PDRF जवान) यांनी रेस्क्यू हार्नेस परिधान करून अतिशय शिताफीने मोबाईल टॉवरवर चढाई केली.
जवानांनी टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून त्याचे मन परिवर्तन घडवून आणले व त्याला सुखरूपरित्या खाली उतरवले. सदर व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुमारे 3 ते 3.5 तासांचा कालावधी लागला.
PMRDA वाघोली अग्निशमन दलाच्या या तत्पर व धाडसी कारवाईमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला असून सर्वत्र जवानांचे कौतुक होत आहे.
वाघोली पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत गर्दीवर नियंत्रण मिळविणे, परिस्थितीवर लक्ष ठेवणे, वाहतूक कोंडी हाताळणे, अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यक साथ देऊन अघटीत प्रसंग टाळण्यात यश मिळविले.

12/10/2026

पुणे नगर रोड लगत वाघोलीतील आमदार चौक येथील मोबाईल टॉवर वर चढला एक व्यक्ती. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान दाखल. व्यक्तीला खाली आणण्यासाठी सुरू आहे प्रयत्न. सोमवारी (दि.१२) सायंकाळी ६ ची घटना

Telephone

Address


Wagholi
Pune
412207

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wagholi Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.